सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक

सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे पाटे /कोलटेक प्रात्यक्षिक
काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार): चांदवड तालुक्यातील पाटे/कोलटेक येथे तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्याच शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत कृषी सहाय्यक जे.एस. निरभवणे यांनी मार्गदर्शन केले व सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता प्रात्यक्षिक करून दाखविले . तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले , की शेतकऱ्यांच्या बियाण्यांवरील खर्चात बचत व्हावी व त्यांनी स्वउत्पादित सोयाबीन बियाण्यांची खरीप हंगामात पेरणी करावी यासाठी गावागावांत व्यापक प्रमाणात प्रात्यक्षिकाद्वारे प्रसिद्धी देण्यात येत आहे . उगवणक्षमतेची तपासणी पद्धत सोपी असून , प्रात्यक्षिक घरच्या घरी करता येत असल्याने शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा , असे आवाहन त्यांनी केले . चांदवड पंचायत समिती सदस्य,नितीन गांगुर्डे सरपंच जयश्री ठोके आदी उपस्थित होते .

पत्रकार -

Translate »