अनुदानातील ट्रॅक्टरसाठी १५ लाख शेतकऱ्यांचे अर्ज तर राज्यातील २५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर
शेती मशागतीचा खर्च वाढल्याने आता शासनाच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. तब्बल १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. पण, शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने २०२३-२४ मध्ये राज्यातील फक्त २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे.राज्य सरकारने राज्यातील १५
हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदानातून दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख रुपयांची सबसिडी दिली जाते. उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर कंपनीला शेतकरी भरतात.