केळी विकास महामंडळ स्थापनेची कार्यवाही अंतिम टप्प्यात, कृषी विभागाने प्रस्ताव पाठविला

0

केळी विकास महामंडळ स्थापनेची कार्यवाही अंतिम टप्प्यात, कृषी विभागाने प्रस्ताव पाठविला

केळी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते हरिभाऊ जावळे यांनी केली होती. त्यांच्या मागणीला सरकारने दुजोरा दिला असल्याची माहिती मिळाली आहे

जळगाव : संपूर्ण भारतात जळगाव (Jalgaon) जिल्हा केळीचा (banana crop) जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. देश, राज्यात जळगावची केळी प्रसिद्ध आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार असो, किंवा लोकप्रतिनिधी फारसे गांभीर्याने विचार करत नसल्याचे चित्र होते.पण आता अखेर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. राज्य खरीप हंगामाबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत खरिपाच्या नियोजनासह शेतीच्या इतर विषयांवरदेखील चर्चा झाली.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा…
“केळी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते स्व. हरिभाऊ जावळे यांनी केली होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांच्यामार्फत परिपूर्ण असा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल. केळी महामंडळ स्थापन झाल्यास जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत, आर्थिक विकास, केळी पिकावरील विविध समस्या व त्याचे निरसन करण्याकरिता सुविधा उपलब्ध होणार”असल्याची माहिती गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री यांनी दिली.
जानेवारी महिन्यात काही बैठकीचे आयोजन
महामंडळ स्थापनेबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आला आहे. तसेच याबाबत जानेवारी महिन्यात काही बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. मात्र, ती बैठक होऊ शकली नव्हती. आता ती बैठक पुणे येथे न होता जळगावला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केळी महामंडळ स्थापन झाले, तर त्या महामंडळाचे कार्यालय कोठे असावे याबाबतदेखील चर्चा सुरू आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »