सेवा निवृत्ती सोहळा दिघवद मध्ये संपन्न
सेवा निवृत्ती सोहळा दिघवद मध्ये संपन्न
विक्रम सर्जेराव मापारी हे 17 वर्ष भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. दि. 04-07-2023 रोजी ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले. देशातील विविध भागात पोस्टींग होतं असताना आपले कार्य त्यांनी चोख पणे पार पाडले.भारतीय सैन्यात भर्ती होऊन एक स्वाभिमानी नौकरी स्विकारून देश सेवा करणे हे बहुतांश तरूणांचं स्वप्न असतं. प्रत्येक देशाला स्वातंत्र्य प्रिय असते.भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक शुर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.
विक्रम सर्जेराव मापारी यांनी बेळगाव, मणिपूर , जामनगर , कोल्हापूर,जन्मू आणि काश्मीर तसेच ऑफिस ट्रेनिंग अकॅडमी गया, तिरूअनंतपुरम २३ मराठा बटालियन मधून आपली सेवा पूर्ण करून आपल्या जन्म भूमीत सुखरूप आल्याबद्दल शांती सेना ग्रुप दिघवद व दिघवद विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सेवा निवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला विक्रम सर्जेराव मापारी यांचा सर्व परीवार उपस्थित होता. प्रथमतः आई वडील व त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. या सेवा निवृत्ती सोहळ्याचं सुत्रसंचालन कैलास पगार यांनी केलं. एका सैनिकांचा जीवनपट कसा असतो हे स्पष्ट करताना कुटुंबासमवेतील तडजोड काय असते हे आपल्या शैलीत त्यांनी मांडले. या कार्यक्रमास स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद येथील विद्यार्थी पण उपस्थित होते. मुलांना या वयात देशसेवा आणि सैनिकाचा सन्मान काय असतो हाच एक उद्देश. शाळेतील जेष्ठ शिक्षक सोनवणे सरांनी मनोगत व्यक्त करून भारतीय सैन्याची कामगिरी आणि देशहितासाठी आजच्या तरुण मुलांनी पुढे येऊन सैन्यात भर्ती झाले पाहिजे असे प्रतिपादन केले.
स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे दिघवद गावातील ७० ते ७५ तरूण भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. त्यातील काही सेवा निवृत्त झाले. या सोहळ्या प्रसंगी शासनाच्या वतीने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध कार्यकारी सोसायटी चे विद्यमान चेअरमन नारायण सिताराम गांगुर्डे , व्हा चेअरमन शोभा शंकर मापारी व ग्रुप ग्रामपंचायत दिघवदचे मा. सरपंच झाल्टे साहेब पण उपस्थित होते.
तशेंच आजी माजी सैनिक उपस्थित होते त्यात बाळासाहेब गाडे किशोर मापारी सुनील गांगुर्डे विलास बारगळ सुनील गांगुर्डे जितेंद्र बारगळ अमित गांगुर्डे चंद्रभान गांगुर्डे कारभारी मापारी रामदास गांगुर्डे हे होते तर दिघवदसोसायटिचे सभापती नारायण गांगुर्डे व संचालक मंडळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व संचालक मंडळ ग्रामपंचायत संचालक मंडळ उतमराव झालटे रावसाहेब गांगुर्डे विठ्ठल गांगुर्डे आनंदा गांगुर्डे उतममापारी सोमनाथ गांगुर्डे सदाशिव जेऊघाले बाळासाहेब रसाळ राजाराम मापारी कैलास पगार सोमनाथ खैरनार भारत गांगुर्डे गंगाधर गांगुर्डे कारभारी गांगुर्डे सुनील गांगुर्डे दिलीप मापारी किशोर गांगुर्डे दिलीप मुंजाळ गोविंद गाडे तर आभार बाळासाहेब गाडे यांनी मांडले