राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा !

मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसला आहे.हवामान खात्याने राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.हवामान खात्याच्या आज कोकणसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट तसेच उत्तर- मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बुधवारी (ता. ५ जुलै) पावसाने हिंगोली व नंदुरबार जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.अनेक गावात चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ६ जुलै रोजी महाराष्ट्र आणि गोव्यात तर ७ जुलै रोजी गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. ६ जुलै रोजी ओडिशात मुसळधार पावसाचे अनुमान आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्येही येत्या २-३ दिवसात मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.
राज्यातील आजचे जिल्हानिहाय अलर्ट – रेड अलर्ट : सिंधुदुर्ग
ऑरेंज अलर्ट : कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा.
यलो अलर्ट : धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, ठाणे, पालघर.
ग्रीन अलर्ट (कोणताही पावसाचा इशारा नाही) : सांगली, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, बीड, परभणी, हिंगोली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागात येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे.