जनावरांसाठी नेपिअरची लागवड

0

जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा, वैरण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, यांचा समावेश होतो. सुमारे 70 टक्के भाग हा हिरवा चारा असतो.त्यामुळे पौष्टिक चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे  ठरते. नेपिअर हे बहुवार्षिक गवत आहे व पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखले जात होते. हे गवत त्याच्या उंचपणा व जास्तीत जास्त फुटवे देण्याच्या क्षमतेमुळे ते नावारूपाला आले.एकदा लागवड केल्यानंतर २ ते ३ वर्ष पुन्हा लागवड करावी लागत नाही. 

लागवडीची पद्धत व उत्पादन

 • खरीप हंगामासाठी जूनमध्ये नेपियर गवताच्या कांड्याची लागवड करावी.
 • मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमिनीची निवड करावी.
 • लागवडीसाठी एक खोल नांगरणी करून घ्यावी, कारण नेपियर गवत जवळपास तीन वर्षे त्याचं जमिनीत राहणार आहे. 
 • २ ते ३ वेळा वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. 
 • शेवटच्या वखरणी वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिक्स करून घ्यावे.
 • दोन डोळे जमिनीत व एक जमिनीवर राहील अशा पद्धतीने लागवड करावी.
 • गवताची ठोंबे (मुळासह) लावावी. लागवडीकरिता साधारणपणे तीन महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावाव्यात.
 • दोन झाडांमध्ये 60 सें.मी. अंतर ठेवावे व गवताची कांडी ४ x २ फूट अंतरावर करावी.
 • गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात.
 • गवताची लागवड केल्यापासून अडीच ते तीन महिन्यांनी पहिली कापणी करावी.
 • कापणीस उशीर झाल्यास गवत जास्त वाढते.पौष्टिकतेचे प्रमाण कमी होते. शक्‍यतो कडबा कुट्टीमध्ये गवत बारीक करून द्यावे.
 • हेक्टरी २००० ते २५०० क्विंटल उत्पादन मिळते.

सुधारित वाण 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील गवत संशोधन प्रकल्पाने संकरित नेपिअर गवताचे “फुले जयवंत’ (आर.बी.एन.-13) हे वाण विकसित केले आहे.”फुले जयवंत’ वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण हे 1.91 टक्के आहेत.त्यात प्रथिने 10.35 टक्के, स्निग्ध पदार्थ 2.38 टक्के, खनिजे 12.32 टक्के, तसेच चाऱ्याची एकूण पचनीयता 61.8 टक्के आहे.

स्त्रोत: अग्रोवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »