राज्यातील या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा यलो अलर्ट 🌧

पुढील दोन तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आज (ता.९) जुलै दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे.पुढील २४ तासांत कोकण, पूर्व विदर्भाच्या काही भागात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.राज्यातील पावसाचा जोर आजपासून काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली.

आज (ता. ९ जुलै) नाशिक जिल्ह्यात ३० मिमी, नंदूरबार जिल्ह्यात १६ मिमी आणि धुळे व जळगाव जिल्ह्यांत ७ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे.

उद्या (ता.१०) नाशिक जिल्ह्यात ३२ मिमी, जळगाव जिल्ह्यात १५ मिमी, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ८ ते ९ मिमी पावसाची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला असून विदर्भात विजांसह पावसाचा, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस झाला आहे.

सध्या प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झालेली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. मात्र देशभरात पाऊस पडत असला, तरी त्याची तीव्रता दर वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

पत्रकार -

Translate »