आहेरखेडे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कल्पना आहेर यांची बिनविरोध निवड


चांदवड(दशरथ ठोंबरे) :–तालुकयातील आहेरखेडे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच अनिता जामदार यांनी आपल्या पदाचा राजनामा दिल्याने येथिल सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती यावेळी दि 18 रोजी निवडूनक निर्णय आधिकारी श्रीमती एस. पी धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. त्यात वेळेनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्पना रवीद्र आहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवड आधिकारी धात्रक यांनी कल्पना आहेर यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.

यावेळी निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन श्रीमंती एस. पी. धात्रक व साहयक तलाठी पी. के. सोनकांबळे,ग्रामसेवक आर.एस.ततार आदीनी काम पाहीले यावेळी संगणक परिचालक योगेश कासव,ग्राम. कर्मचारी गोकुळ जाधव, तुकाराम पवार यांनी सहकार्य लाभले तसेच नवनिर्वाचीत सरपंच यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी समाधान मामा जामदार (कार्याध्यक्ष चांदवड तालुका काँग्रेस कमिटी) माजी सरपंच अनिता जामदार उपसरपंच संतोष जामदार,ग्रा प सदस्या रोहिणी जामदार,वैशाली गोधडे,पुंडलिक पठाडे ,दादासाहेब जामदार (उबाठा शिवसेना गण संघटक)यांनी बिनविरोध निवडीसाठी परिश्रम घेतले तसेच यावेळी चेअरमन बाजीराव जामदार, बाळासाहेब जामदार उत्तम कासव,भगवान जाधव,पोलीस पाटील विजय गोधडे राजाराम आहेर,शिवाजी आहेर,नितीन जामदार आदी उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »