Soil Fertility : जमिनीची सुपीकतेसाठी अन्नद्रव्यांचे नियोजन
Soil Fertility : जमिनीची सुपीकतेसाठी अन्नद्रव्यांचे नियोजन
Land Update : जमीन, पाणी आणि हवामान या तीन नैसर्गिक संसाधनांचा पीक उत्पादनामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. जमिनीत असंख्य प्रकारचे सूक्ष्मजिवाणू असतात.
Supply Of Organic Fertilizers : जमीन, पाणी आणि हवामान या तीन नैसर्गिक संसाधनांचा पीक उत्पादनामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. जमिनीत असंख्य प्रकारचे सूक्ष्मजिवाणू असतात. त्यातील विविध प्रकारचे सूक्ष्मजिवाणू हे मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात.
पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अनियंत्रित वापर, सेंद्रिय आणि जैविक खतांचा अपुरा पुरवठा यामुळे जमिनीची सुपीकता खालावत आहे. सेंद्रिय पदार्थ हेच सूक्ष्मजिवाणूंचे अन्न आहे. जर पुरेशा प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खतांचा वापर केला तर जमिनीत सूक्ष्मजिवाणूंची संख्या निश्चितच वाढते.
सेंद्रिय खतांची उपलब्धता नाही म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढवणे अतिशय चुकीचे आहे रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच पर्याय होऊ शकत नाहीत. सेंद्रिय खतात सर्व प्रकारची अन्नद्रव्ये थोड्या प्रमाणात असतात.
उदा. एक टन शेणखतापासून नत्र ५.६ किलो, स्फुरद ३.५ किलो, पालाश १७.८ किलो, गंधक १ किलो, मंगल २०० ग्रॅम, जस्त ९६ ग्रॅम, लोह ८० ग्रॅम, बोरॉन २० ग्रॅम, १५.६ ग्रॅम तांबे, २.३ ग्रॅम मोलाब्द इत्यादी प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. पण या व्यतिरिक्त या सेंद्रिय खतांपासून आपणास विकर, संप्रेरके आणि जीवनसत्वे मिळतात.
यामुळे पीक उत्पादनाचा दर्जा उदा. गोडी, रंग, शिवाय रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती वाढते. या व्यतिरिक्त जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मामध्ये लक्षणीय सुधारणा होते.
१. पिकांच्या फेरपालटीत मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, तूर या पिकांचा समावेश करावा.
२. पिकांना शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खतांचा (शेणखत / कंपोस्ट खत / गांडूळ खत) वापर शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर जमिनीत मिसळून करावा.
३. क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात फुले सुरु होताच गाडावा किंवा उसात आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.
४. रासायनिक खतांबरोबर निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर केल्यास सेंद्रिय कर्बाच्या वाढीबरोबरच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
५. शेतीमध्ये मशागतीसाठी यांत्रिकी कृषी अवजारांचा अतिरेकी वापर टाळावा. त्यामुळे जमिनीत स्थिर झालेला कर्ब हवेत उडून जाणार नाही. जमिनीची कमीत कमी मशागत करावी. म्हणजे धूप कमी होऊन त्याबरोबर वाहन जाणाऱ्या कर्बास प्रतिबंध होईल.
६. शेतातील पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. पिकांची धसकटे, फुले येण्यापूर्वी तणांचा वापर, तूस, फोलकटे, उसाची खोडकी किंवा खोडवा उसात पाचट न जाळता आच्छादन म्हणून वापर करावा.
७. चोपण जमिनीत सेंद्रिय भूसुधारक (मळी कंपोस्ट) आणि रासायनिक भूसुधारक जिप्समचा शेणखतात मिसळून वापर करावा. आम्ल जमिनीत लाईमचा सामुच्या प्रमाणानुसार वापर करावा.
८. शेतातील सर्व मशागती उताराच्या आडव्या कराव्यात, बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.
९. जैविक खतांचा बीजप्रक्रियाद्वारे तसेच समस्यायुक्त जमिनीत शेणखतात मिसळून वापर करावा.
१०. क्षारपड तसेच चुनखडीयुक्त जमिनींमध्ये जीवामृत किंवा शेणस्लरीचा वापर वाफश्यावर पिकांना पाण्याद्वारे किंवा ड्रेचिंगद्वारे जमिनीद्वारे करावे.
११. ठिबक सिंचन किंवा तुषार सूक्ष्मसिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे.
धन्यवाद
🙏🙏🙏