काजीसांगवी विद्यालयात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा

काजीसांगवीः-(उत्तम आवारे) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या काजीसांगवी येथील कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.दौलतराव नागुजी ठाकरे व सर्व सदस्य, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाबुराव पांडुरंग सोनवणे व सर्व सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर,मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, पर्यवेक्षक सुभाष पाटील उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने “मेरी मिट्टी मेरा देश” या उपक्रमाची घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले .आजचा हा दिवस अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डी.के. ठाकरे साहेब यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ध्वजपूजन जेष्ठ सभासद पुंजाराम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजाचे ध्वजारोहण उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाबुराव पांडुरंग सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले झाले.
यानंतर स्काऊट- गाईड च्या ध्वजाचे ध्वजपूजन डॉ. नितीन गांगुर्डे यांनी केले तर ध्वजारोहन वसंत माधवराव ठाकरे यांनी केले.तसेच तोफ उडवण्याचा मान बाबासाहेब माधव ठाकरे यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रगीत,राज्यगीत व ध्वजगीत त्याचप्रमाणे स्काऊट – गाईड प्रार्थना व झेंडा गीत तसेच देशभक्तीपर गीत विद्यालयातील संगीतशिक्षक बापू ठाकरे यांच्या गीतमंचाने सादर केले. या गीताने सर्व वातावरण देशभक्तीमय झाले होते.
आजच्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते वेशभूषेतील विद्यार्थी. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हे विद्यार्थी वेगवेगळी वेशभूषा करून आलेले होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयातील प्रणाली ठाकरे,कोमल ढोमसे,ओम काळे ह्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी परिसरातील माजी विद्यार्थी यांनी देखील आपली हजेरी लावली. गावातील जेष्ठ- श्रेष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सरपंच – सदस्य, सोसायटी अध्यक्ष – सदस्य, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीने आजचा हा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी स्काऊट – गाईड चे विद्यार्थी आपल्या गणवेशात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख माणिक कुंभार्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती व सर्व सदस्य, शिक्षक-शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.




   फोटो - काजीसांगवी येथील विद्यालयात  स्वातंत्र्य दिन साजरा करतांना उपस्थित सर्व मान्यवर.................

पत्रकार -

Translate »