नाशिक-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कार आणि कंटेनरमध्ये धडक; कारमधील चार जण जागीच ठार

0

चांदवड (उत्तम आवारे ): नाशिकच्या चांदवड तालुक्यातील नमोकार तिर्थक्षेत्रासमोर आज सकाळी भीषण अपघात झाला. मुंबई-आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरमध्ये धडक झाली. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत.

अपघातग्रस्त कार धुळे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. ते सर्वजण नाशिककडून धुळ्याकडे चालले होते. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच वडनेर भैरव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्गही ठप्प झाला होता. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं महामार्गावरील वाहतूक सुरळित करण्यात आली आहे.

या भीषण अपघातात चार तरुण तरुणींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक

वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. वाहन चालवताना वेग मर्यादेचे पालन करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि झोपेची आवरणी करणे अशा गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »