मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत उर्धुळ ग्रामपंचायत च्या वतीने भव्य अमृत कलश मिरवणूक
दिघवद वार्ताहर(कैलास सोनावणे ): भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत उर्धुळ ग्रामपंचायत च्या वतीने भव्य अमृत कलश मिरवणूक काढण्यात आली यावेळी कलशाची मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून लेझीम पथक ढोल ताशा पारंपारिक वाद्य गोंधळी भजनी मंडळ पताका यांच्या संयुक्त पारंपारिक वाद्य लावून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
रथामध्ये कलश आणि रथ यांची सजावट करून यात्रा काढण्यात आली यावेळी संपूर्ण गावातून मोठ्या उत्साहाने कलशात माती टाकण्यात आली यावेळी ठीक ठिकाणी रांगोळी काढण्यात आली ही मिरवणूक शहीद झालेल्या जवानांचे स्मारक येथे नेण्यात आली व हा कलश तेथे ठेवण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य उपकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी चांदवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील पाटील विस्तार अधिकारी राठोड सरपंच कविता श्रीहरी ठाकरे यांच्या हस्ते पूजन करून कलशा मध्ये माती टाकण्यात आली.
यावेळी उपसरपंच मिरा दत्तात्रय ठाकरे ग्रामपंचायत सदस्य तानाजी साठे बापू ठाकरे अशोक नवले गणपत ठाकरे सिताराम खुटे रामदास खुटे योगेश खुटे ग्रामसेवक आम्रपाली देसाई ग्रामसेवक पवार भाऊसाहेब ग्रामपंचायत कर्मचारी विकास साबळे दत्तू खुटे तुषार आवारे अतुल खुटे संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एल खुटे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भागुबाई ठाकरे व त्यांचे सर्व शिक्षक कर्मचारी व अंगणवाडी सेविका शाळेतील सर्व विद्यार्थी ग्रामस्थ श्री प्रकाश पवार श्रीहरी ठाकरे रामदास ठाकरे सुखदेव ठाकरे गणपत खुटे भिका दादा खुटे माधव साठे सुरेश जाधव खंडू साठे रंजना धुमाळ नारायण ठाकरे रेवन ठाकरे सुखदेव पाटील खुटे रमण सरपंच खुटे वसंत ठाकरे रंगनाथ खुटे बाबाजी ठाकरे माधव खुटे दत्तोपंत खुटे बापू खुटे शरद ठाकरे मुन्ना सोनवणे वाल्मीक खुटे ज्ञानेश्वर ठाकरे भाऊसाहेब ठाकरे निवृत्ती ठाकरे पंडित ठाकरे नाना जाधव दत्तू जाधव किरण देवरे गणेश सोनवणे चेतन ठाकरे अदी ग्रामस्थ तंटामुक्ती समिती विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हा चेअरमन संचालक मंडळ भजनी मंडळ वाघे मंडळ गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.