केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान, या सरकारचा मोठा निर्णय
केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान, या सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी बिहार सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणार आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीची लागवड करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार आहे.
राज्य सरकार टिश्यू कल्चर पद्धतीनं केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे. बिहार सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
एक हेक्टरमध्ये केळीची लागवड करण्यासाठी सुमारे 1.25 लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चावर राज्य सरकार 50 टक्के अनुदान देते. शेतकर्यांची थेट 62500 रुपयांची बचत होणार आहे. म्हणजेच निम्मी रक्कम शेतकर्यांकडून आणि अर्धी रक्कम राज्य सरकारच्या पातळीवरुन दिली जाणार आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏