काजीसांगवी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

0

काजीसांगवी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा ……….


काजीसांगवी (उत्तम आवारे)
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कै.नरहर पंत कारभारी ठाकरे जनता माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे थोर शास्त्रज्ञ,भारताचे ११वे राष्ट्रपती ,भारतरत्न डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांना जन्म दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. व्यासपीठावर मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील उपस्थित होते . त्यानंतर पाचवी च्या विद्यार्थिनींनी मिसाइल मॅन अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची,अग्निपंख या आत्मचरित्राची माहिती सांगितली. तसेच त्यांचा जन्मदिन *वाचन प्रेरणा दिन* म्हणून साजरा केला जातो याबद्दल माहिती सांगितली.शिक्षक मनोगतातून देवरे मॅडम व माणिक कुंभार्डे यांनी अब्दुल कलाम यांची संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व योगदान ,पृथ्वी ,अग्नी या क्षेपणास्त्र तयार करण्यासाठीचे योगदान याविषयी माहिती दिली .
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक न्याहारकर सर यांनी डॉ कलाम यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली तसेच वाचन प्रेरणा दिनाची माहिती दिली.या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाचे आव्हान केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पर्यवेक्षक सुभाष पाटील सर यांनी सांगितले की, वाचनातून च आपण घडतो.शिक्षणासाठी कधी परिस्थिती आड येत नाही .इच्छा आणि प्रयत्न यांच्या जोरावर सामान्य व्यक्ती देखील असामान्य काम करू शकतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अब्दुल कलाम .आपणही त्यांच्या जीवन प्रवासातून आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे.वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने १तास वाचनासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाधान कोल्हे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे
सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »