चांदवड येथे कालिकामाता प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
काजीसांगवीः(उत्तम आवारे) चांदवड हे नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण चांदवड गावच्या पूर्वेला एक गुहा कोरलेली असून ती सुमारे आठव्या ते नवव्या शतकातील असावी या गुहे मध्ये जैन धर्माचे आद्य चंद्रप्रभू भगवान यांच्यासह अनेक मूर्ती कोरलेल्या आहे त्याच बरोबर हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या देवता गणपती,कालिका देवी ,शितला माता यांच्याही मूर्ती याच गुहेत आपल्याला बघायला मिळतात यावरून सर्वधर्म समभावाचा संदेश नक्कीच मनाला बोध करून जातो सह्याद्रीच्या या पर्वत रांगेत अंदाजे अडीचशे फूट चालून गेल्यानंतर ही गुहा लागते गुहेत प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच दिसते ती भगवान चंद्रप्रभू ची शांत ध्यानस्थ मूर्ती जैन धर्माचे मूळ नायक १००८श्री चंद्रप्रभू भगवान, आदिनाथ भगवान, पार्श्वनाथ भगवान अशा अनेक मूर्ती या गुहेमध्ये कोरलेल्या आहेत गुहेमधील कालिका मातेची सुहास्यमूर्ती ..ही कालिका म्हणजेच जैन तत्वज्ञानात व धर्मग्रंथातील पद्मावती माता आहे असे म्हणतात गुहेच्या पायथ्याशी पूर्वी आजच्या गोसावी कुटुंबीयांचे वंशज दयालपुरी नावाचे गृहस्थ राहत होते त्यांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी देवी अहिल्याबाई होळकर यांचे सासरे तुकोजी होळकर यांच्याकडे जागेची मागणी मंजूर व्हावी यासाठी सुमारे ४१ दिवसांचे एका पायावर तप केले व जागा मिळवली असे सांगितले जाते या मागणीवरूनच आजही चांदवड येथील गोसावी कुटुंबीयांकडे वारसा हक्काप्रमाणे या मंदिराची देखभाल व व्यवस्था आहे त्या संदर्भातील जुनी कागदपत्रेही त्यांनी आज देखील जतन करून ठेवली आहे वंश विस्तारामुळे सदर गोसावी कुटुंबीय यांनी एक वर्षाची मंदिर व्यवस्थापनाची पाळी ठरवून घेतली आहे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला हि पाळी बदलली जाते कालिका देवी अनेक हिंदू धर्मियांची कुलस्वामिनी आहे गुहेतील कालिकादेवीची मूर्ती ही चतुर्भुज असून आसनस्थ आहे अतिशय प्राचीन असल्यामुळे सदर मूर्तीची बरीच झीज झालेली होती तरी सदर मूर्तीचे वज्रलेपन पुणे येथील मूर्ती सु प्रसिद्ध कारागीर श्री विशाल ओस्त वाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले मूर्तीचा पुन:प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दिनांक १६/१०/२०२३ (नवरात्री दुसरी माळ) रोजी संपन्न झाली सदर कार्यक्रमाचे पौरोहित्य श्री अमोल दीक्षित गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील राहुल जोशी ,किशोर हरिदास ,प्रशांत चंद्राते या ब्रह्मवृंदानी केली व पुजेस कालिका माता मंदीराचे पुजारी श्री .सुंशात संतोष पुरी गोसावी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तसेच अभिजीत कापडणी ,प्रकाश जाधव ,आप्पा देशपांडे ,विजय देशपांडे यांनी होमहवन यज्ञाची मनोभावे पुजा केली आहे तरी कार्यक्रमास बहुसंख्य भाविकांनी दर्शनाचा , व प्रसादाचा आस्वाद घेतला अशी माहिती चांदवड येथील ह.भ.प.भुषण महाराज कोतवाल यांनी दिली