HTBT Cotton : देशात ‘एचटीबीटी’च्या लागवडीत मोठी वाढ

0

HTBT Cotton : देशात ‘एचटीबीटी’च्या लागवडीत मोठी वाढ

देशात कायदेशीर मान्यता नसलेल्या अर्थात बेकायदा तणनाशक सहनशील म्हणजेच एचटीबीटी बियाण्याची लागवड वाढत आहे.
HTBT Cotton देशात कायदेशीर मान्यता नसलेल्या अर्थात बेकायदा तणनाशक सहनशील म्हणजेच एचटीबीटी बियाण्याची लागवड (HTBT Seed Sowing) वाढत आहे. देशातील एकूण कापूस लागवडीपैकी (Cotton Cultivation) तब्बल १५ टक्के क्षेत्र ‘एचटीबीटी’खाली असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.
यंदाही ‘एचटीबीटी’ची बेकायदा लागवड वाढेल, अ वतसा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना प्रगत बियाणे तंत्रज्ञान देण्याची मागणी खुद्द शेतकरी आणि उद्योग करत असतानाही सरकारी पातळीवर दुर्लक्ष होताना दिसत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
सध्याचे बीटी बियाणे तंत्रज्ञान फोल ठरत आहे. पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. उत्पादकताही कमी झाली. उत्पादन खर्चही वाढत आहे. त्यामुळे शेतकरी जगात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक बियाणे तंत्रज्ञानाची मागणी करत आहेत.
पण सरकारी पातळीवर याबाबत चकार शब्दही काढला जात नाही. यामुळे काही शेतकरी परवानगी नसलेल्या तणनाशक सहनशील म्हणजेच एचटीबीटी कापूस वाणाची लागवड करीत आहेत.
सध्या होत असलेली लागवड बेकायदा आहे. पण ‘एचटीबीटी’ला परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांकडूनही होत आहे. पण अनेक वर्षांच्या या मागणीला सरकारी पातळीवर केराची टोपली दाखविली जात आहे.
मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक बियाणे मिळत नाही. सध्याचे बीटी बियाणे कीड-रोगांना बळी पडते. बियाण्यापासून फवारणी, आंतरमशागत ते वेचणीचा खर्च वाढला आहे.
यामुळे कापसाच्या उत्पादन खर्चात अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. पावसाने नुकसान होते. कापसाचा भाव वाढलेला नाही. बाजारात कापूस भावात जी काही तेजी मंदी होते त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची स्थिती आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »