हार्ट अटॅक म्हणजे काय? कोणत्या कारणानांमुळे येतो हृदयविकाराचा झटका?

हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग असून. हा एक स्नायू आहे जो पंप म्हणून काम करतो. आपल्या हृदयाचा आकार हाताच्या मुठीच्या बरोबरीचा आहे. ह्रदय छातीच्या डाव्या बाजूला आणि दोन फुफ्फुसांच्या दरम्यान स्थित आहे. ते सतत आकुंचन आणि प्रसरण होत असते. आकुंचन आणि प्रसरण करण्याच्या क्रियेमुळे, आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्ताचा प्रवाह असतो.

हृदयविकाराचा झटका /हार्ट अटॅक म्हणजे रक्ताच्या अभावामुळे काही भाग नष्ट होण्याची प्रक्रिया घडते. त्याची अनेक कारणं असू शकतात. जर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये वंगण कमी झालं, तर रक्त हृदयापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही. या अडथळ्यामुळे हृदयामध्ये रक्ताची कमतरता होऊन वेदना सुरू होता. याला एनजाईना पेक्टोरिस म्हणतात. कधीकधी या सर्व परिस्थिती ऑक्सिजनमध्ये देखील अडथळा निर्माण होतो. जर हृदयाच्या आत रक्ताभिसरण थांबले तर तो भाग निष्क्रिय होतो. जर शरीर हा भाग पुन्हा सक्रिय करु शकत नसेल तर अशा स्थितीला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक म्हणतात.

हृदयविकाराची लक्षणे काय आहेत?

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा काही विशेष लक्षणे दिसू लागतात. सर्वप्रथम हृदयात वेदना जाणवते.छातीत दुखणं – सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण. डाव्या हाताला वेदना होतात. या वेदना असह्य असतात. डावा हात सुन्न होऊ लागतो. श्वास घेण्यास त्रास होतो. नाडी वेगाने हलू लागते. अस्वस्थता जाणवू लागल्याने जीव गुदमरतो. उलटी किंवा मळमळ – बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो, पण तो हृदयापासून असू शकतो. ॲसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू शकतो.काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणे.छाती जड वाटणे,छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणे, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणे.दम लागणे- श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणे. काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणे.
कोरडा खोकला – दुसऱ्या कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहणे.

असे लक्षणे जाणवल्यास काय करावे ?

शांतपणे पडून राहावे व मदतीसाठी तातडीने कुणाला तरी बोलवावे.
हालचाल करू नये. स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न करू नये. जिने चढणे आणि उतरणे करू नये. स्वतः गाडी चालवू नये.ॲस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घेणे. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवावे.

ॲम्ब्युलन्सला ताबडतोब बोलवणे.पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतले आहे त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास व बाहेरून हृदयाला कृत्रिम (कार्डिॲक मसाज) दाब देणे हे यावेळी गरजेचे असते. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत हे उपाय करणे
गरजेचे असते. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकते.

कोणत्या कारणानांमुळे येतो हृदयविकाराचा झटका?

फास्ट फूडचे अतिसेवन, उच्च रक्तदाबाचा त्रास, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढ,मधुमेहाचा त्रास अशा कारणांमुळे
ग्रामीण भागातील तरुणांच्या तुलनेत शहरी भागातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी आधुनिक जीवनशैलीच जबाबदार आहे. हृदयाचा सर्वात मोठा शत्रू तणाव आहे. आर्थिक, कौटुंबिक ताण-तणाव, करिअर, नोकरीचा भार अशा अनेक प्रकारे हे घडते.पुरेशी झोप न मिळणे, निरोगी राहण्यासाठी ६-८ तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाइल फोन वापरणे हे याचे सर्वात मोठे कारण आहे.
अनुवांशिक; कुटुंबातील एखाद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असेल किंवा तो हृदयरोगी असेल, तर त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अतिव्यायाम करणारे लोकही हृदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरले आहेत.

हृदयविकार टाळायचा असेल तर काय करावे?

आहार नियमित असणे गरजेचे असते, तसेच संतुलित आहार शरिराला गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम आवश्यक करावा. तसेच तणावमुक्तीसाठी योगसाधना करावी.
एखाद्या सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून जावे व
फास्ट फूट शक्यतो टाळावे.तसेच आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश अधिकाधिक असावा. BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्सनुसार वजन नियंत्रित करा.बीपी/रक्तदाब १२०/८० असावा.हृदय गती ५५ ते ९० बीट्स प्रति मिनिट असावे.
कोलेस्ट्रॉल: बॅड कोलेस्ट्रॉल १०० mg/dl पेक्षा कमी, चांगले कोलेस्ट्रॉल ६० mg/dl पेक्षा जास्त असावे.
साखर: शरीरातील रक्तातील साखरेची पातळी १२६ mg/dL पेक्षा जास्त आणि जेवणानंतरची साखरेची पातळी १६० mg/dL पेक्षा जास्त उपवास करणे धोकादायक आहे.

तपासणी कधी करावी?

३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा किंवा उच्च कोलेस्टेरॉल, बीपी, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अशा व्यक्तीने नियमितपणे हृदय तपासणी केली पाहिजे. लक्षणे दिसण्यापूर्वी २ डी इको आणि टीएमटी यासारख्या चाचण्या हृदयाच्या अडथळ्याचे निदान करण्यात मदत करतात. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा किंवा उच्च कोलेस्टेरॉल, बीपी, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अशा व्यक्तीने नियमितपणे हृदय तपासणी केली पाहिजे. जर एखाद्याला छातीत दुखणे, श्वास लागणे, थकवा, अनियमित किंवा हृदयाचे ठोके इत्यादी लक्षणे असतील तर त्यांनी त्वरित हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पत्रकार -

Translate »