सोनीसांगवी ग्रामपंचायत येथे संविधानदिन साजरा
सोनीसांगवी ग्रामपंचायत येथे संविधानदिन साजरा.
सोनीसांगवी(प्रविण ठाकरे) :सोनी सांगवी ग्रामपंचायत येथे राज्यघटनेचे शिल्पकार व मसुदा समितीच्या सदस्याच्या प्रतिमेचे पूजन माजी. पोलीस पाटील श्री पंढरीनाथ ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रविण ठाकरे यांनी भारतीय संविधान, त्याची निर्मिती त्यासाठी केलेला मसुदा याबद्दलची माहिती दिली.याप्रसंगी सरपंच सौ. अलका ठाकरे.ग्रामपंचायत सदस्य श्री प्रविण ठाकरे,श्री पंढरीनाथ ठाकरे, निवृत्ती जगताप, मयुर ठाकरे,अनिल पवार,रवी शिंदे, अजित बनकर,श्री संदीप जाधव, गोरख ठाकरे, अमोल ठाकरे, वसंत गांगुर्डे, सौ. अलका घंगाळे, सौ.सुमनबाई जगताप सौ. कोंड्याबाई गांगुर्डे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.