तळेगावरोही येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गारपीटग्रस्त पिकांची केली पाहणी

तळेगावरोही येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गारपीटग्रस्त पिकांची केली पाहणी

शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला दिली सक्त ताकिद

काजी सांगवी (वार्ताहर भरत मेचकुल) दि 1 तळेगावरोही ता. चांदवड येथे आज दुपारी चार वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच नुकसानीपासून कोणीही शेतकरी वंचित राहता कामा नये अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला केल्या.
26 नोव्हेंबर रोजी चांदवड तालुक्यात दक्षिण पूर्व भागात तुफान गारपीट झाल्याने कांदा आणि द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेक घरांची पडझड झाली. कांदा आणि द्राक्ष पिकांचे परिपक्वतेच्या अंतिम काळात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास निसर्गाने हिरवून घेतल्याने या अस्मानी संकटांने शेतकऱ्यांच्या तोंडात मारल्यासारखी स्थिती झाली आहे. यामुळे शेतकरी दास्तावून गेले आज मंत्री डॉ. भारती पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. ज्या लोकांची घरे उडाली तसेच ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले या सर्वांच्या मदतीसाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच नैसर्गिक संकटाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सर्वांचे पंचनामे करावे अशा स्पष्ट सूचना केल्या. यावेळी शेतकऱ्यांसह माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल तहसीलदार मंदार कुलकर्णी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »