नाशिक मधील पंचवटीत राहणाऱ्या युवकाचा मृतदेह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याने उडाली खळबळ…

नाशिक : पंचवटीतील तरूणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. महिरावणीत येथील या घटनेने खळबळ उडाली आहे.पंचवटीतील कालिकानगर येथे राहणाऱ्या युवकाचा मृतदेह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे. युवकाच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.


त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावाच्या शिवारात असलेल्या आनंद रिसॉर्टच्या पुढे दि. २६ (मंगळवार) रात्री एकच्या सुमारास लक्ष्मण शंकर जाधव असे युवकाचे नाव असून वय ३४, (रा. कालिकानगर,दिंडोरीरोड) हा बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना मिळाला .उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले व डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत लक्ष्मण जाधवच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याने व जास्त रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा खूनच असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या युवकाची हत्या कुठे आणि कशी केली गेली, याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

पत्रकार -

Translate »