शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेला आयुष्यातून उठवले; उसाच्या फडाला लावली आग

शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेला आयुष्यातून उठवले; उसाच्या फडाला लावली आग

कोल्हापूर Krushi News Network : शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेला आयुष्यातून उठवले. हा प्रकार उघडकीस येऊ नये उसाचा फड पेटवून दिला. पण तिसऱ्या डोळ्यात हा प्रकार कैद झाला. आजरा तालुक्यातील खुनाला वाचा फुटली. आणि एक झाकले कुकर्मं जगासमोर आले.
या घटनेत आशाताई मारुती खुळे ( वय ४२ ) या विधवा महिलेचा बळी गेला. याप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील ( वय ४६, रा. भादवन) याला आजरा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती अशी, संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. ती आई सोबत भादवन येथे राहते. भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने सदर महिलेला ओढत नेले. तेथे त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आशाताईने जोरदार विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिचा गळा आवळून खून केला .

हा प्रकार झाकला जावा यासाठी उसाच्या फडाला आग लावली. आग आटोक्यात आणण्याण्यासाठी योगेशचा आटापिटा सुरु होता. उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. तथापि गावातील कॉन्स्टेबल समीर कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला.

पत्रकार -

Translate »