अंगणवाडी कर्मचारी संपावर; पालकांचाही संपला पाठींबा, पहा व्हायरल व्हिडीओ

आहार देणाऱ्या महिलेस पालकांनी सूनवलं, संपात आहार घेण्यास केला विरोध

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल भेट, पोषण आहाराचे प्रमाण वाढावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने 4 डिसेंबरपासून महाराष्ट्रभर बेमुदत संप पुकारला आहे. यासंदर्भात अधिसूचना काढण्यासाठी अंगणवाडी सेविका ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर जमल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात ही नोटीस बजावली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्यूईटी मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, दोन वर्षे उलटूनही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निम्म्या पगाराएवढे मासिक पेन्शन देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी अंगणवाडी केंद्रांमधील बालकांसाठी पोषण आहाराचे प्रमाण वाढवून अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने अद्याप अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन दिलेले नाहीत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील 200,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

पत्रकार -

Translate »