जळगावकरांनो सावधान : घरात कोणीच नाही पाहून चोरट्यांनी घर फोडून चोरले दागिने आणि रोख रक्कम

घरफोडी

चोरी

जळगाव (कृषीन्युज नेटवर्क) : घर बंद करून बाहेर गेलेले असताना हेमंत मार्तंड देशमुख (४५, रा. हायवे दर्शन कॉलनी), यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून यावेळी चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व चांदीच्या देवी-देवतांच्या मूर्ती, भांडे आणि रोख रक्कम चोरून नेली असा एकूण १ लाख २५ हजार ९०० रुपये (मूळ किंमत ११ लाख ) किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना हायवे दर्शन भागात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत देशमुख यांचे मेडिकल दुकान असून ते २८ डिसेंबर रोजी, रात्री १ ते मंगळवारी २ जानेवारी सकाळी ७:३० वाजेच्यादरम्यान घर बंद करून नवीन वर्ष असल्याने देव दर्शना करिता आपल्या सर्व कुटुंबा सोबत बाहेर गेलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्ती, चांदीचे भांडे चोरून नेले. हा प्रकार मंगळवार, २ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता उघडकीस आला, तेव्हा त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. वरच्या मजल्यावर गेल्यावर त्यांना कपाटातील सोने-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आल्यावर हेमंत देशमुखानी तत्काळ तालुका पोलिसांना संपर्क साधून संपूर्ण हकिगत सांगितली त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपो.निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.

पत्रकार -

Translate »