मराठा विद्या प्रसारक समाजाचे , श्रीराम विद्यालय रायपुर येथे बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न
![](https://krushinews.com/wp-content/uploads/2024/01/780a4a78-8738-4bfb-b04d-4ac367555a7e-1024x576.jpeg)
मराठा विद्या प्रसारक समाजाचे , श्रीराम विद्यालय रायपुर येथे बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न
काजीसांगवीः (उत्तम आवारे) 3 जानेवारी : श्रीराम विद्यालय रायपुर येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली . आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. रोडे सर होते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यालयातील सर्व उपशिक्षिका होत्या. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी भाषणे झालेत. शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयातील उपशिक्षिका श्रीम. पवार मॅडम यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगीतली. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले.
आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. के. गांगुर्डे सर, सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनन्या क्षीरसागर व श्रद्धा वाघ यांनी केले.