आमिर खान ची लाडकी लेक इराचे लग्न!पहा कोण आहे जावई..फोटोही व्हायरल..
इरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले.इरा आणि फिटनेस ट्रेनर नुपूर यांनी आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत मुंबईत लग्न केले. लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, वडील-मुलगी जोडीचा एक फोटो-परफेक्ट क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.नवरदेव नुपूर शिखरे ८ किलोमीटर धावत लग्नस्थळी पोहोचला होता, त्यामुळे हे लग्न जरा हटके ठरले.नुपूर व त्याचे मित्र जिमवेअरमध्ये ताज लँड्स एंड याठिकाणी पोहोचले होते.सध्या सोशल मीडियावर इरा आणि नुपूरच्या फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
चित्रात वधूचे वडील आमिर खान इराला मिठी मारताना दिसत आहेत. तसेच, नुपूर शिखरे कॅज्युअल पोशाखात, दिसला.इरा खान एक मानसिक आरोग्य सपोर्ट ऑर्गनायझेशन चालवते, तर नुपूर शिखरे ही फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर खान, सुष्मिता सेन यांच्यासह इतर सेलिब्रिटींना प्रशिक्षण दिले आहे. नुपूर शिखरे आणि इरा खान यांची सप्टेंबर २०२२ मध्ये एंगेजमेंट झाली.
नुपूर शिखरेने इराला आयर्नमॅन इटलीमध्ये प्रपोज केले, जिथे तो सहभागी झाला होता.यावेळी इरा आणि नुपूरसोबत खान आणि शिखरे कुटूंबातील सदस्य उपस्थित होते. तसेच आमिर खानच्या लेकीच्या लग्नाला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे दोघेही खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ समोर आला आहे. आमिरच्या दोन्ही पुर्व पत्नींचा मराठमोळा लूक देखील व्हायरल झाला होता.मे महिन्यात आयरा आणि नुपूरचा साखरपुडा पार पडला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.