यंदा साखरनिर्मितीत कोल्हापूर आघाडीवर..
राज्यात १ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झाले असून मागील दोन महिन्यात राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ४० टक्क्यांपेक्षा जास्त उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकाराचे जाळे असल्याने जवळपास २० सहकारी साखर कारखाने आहे.आतापर्यंत ४ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ४१.८६ लाख टन साखरनिर्मिती करण्यात आली आहे. एकरी उत्पन्न वाढत असल्याने अंदाजापेक्षा साखरनिर्मिती अधिक होत आहे.
साखरनिर्मितीत अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर विभाग अव्वल ठरला आहे. राज्यात सुरू असलेल्या हंगामात ९७ सहकारी तर १०० खासगी कारखाने गाळप करत आहे.दरम्यान यंदा पाऊस कमी झाल्याने उसाचे क्षेत्र घटण्याची भिती पहिल्यापासून व्यक्त केली जात होती. उसाच्या एकरी उत्पादनात काहीशी वाढ झाली असल्याने सुधारित अंदाज नव्वद लाख टन साखरनिर्मितीपर्यंत गेला आहे.चांगला साखर उतारा मिळाल्याने कोल्हापूर विभागाने ९८ लाख टन उसाचे गाळप करत दहा लाख टन साखरेची निर्मिती केली आहे.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हंगाम लांबणीवर गेला याचा फारसा काही फरक पडला नसून जिल्ह्यातील साखर कारखाने उशिरा सुरू झाले, साखरेचा भाव वाढला पाहिजे तरच लाभ होईल.शासनाने २०१९ साली जो साखरेचा एमएसपी वाढवली आहे ती वाढवावी यामुळे कारखानदारांना याचा फायदा होईल तसेच एफआरपीच्या जोडीला साखरेचा भाव वाढल्यास याचा सर्वांना लाभ होऊ शकतो.