चांदवडला माजी आमदार स्व. जयचंद कासलीवाल ट्रस्टतर्फे पत्रकाराचा गुणगौरव समारंभ संपन्

चांदवडला माजी आमदार स्व. जयचंद कासलीवाल ट्रस्टतर्फे पत्रकाराचा गुणगौरव समारंभ संपन्

दिघवदः कैलास सोनवणे – मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चांदवड तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव सोहळा चांदवड येथील विश्रामगृहाच्या सभागृहात लोकनेते स्व. माजी आमदार जयचंद दीपचंद कासलीवाल चॅारिटेबल ट्रस्टच्या वतीने चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी विष्णु थोरे होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार महेश गुजराथी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजयराम काळे, विद्यमान अध्यक्ष भरत मेचकुल होते. यावेळी भूषण कासलीवाल यांनी पत्रकार बांधवाच्या समस्या ज्ञात असून आगामी काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविणार असून पत्रकाराबद्दल ऋृण व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगीतले.तर कवीवर्य विष्णु थोरे यांनी आता स्पर्धेच्या युगात पत्रकारीता क्षेत्रात मोठा बद्दल झाल्याचे सांगुन लेखणी बोलकी असावी तर पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लेखणी चालवावी तर आजच्या डिजीटल व सोशल मिडीयाच्या युगात प्रिंट मिडीयाचे महत्व अन्यय साधारण असल्याचे सांगीतले तर यशवंत पवार यांनी पत्रकारांनी समाज उपयोगी काम करुन अधिकाधिक कार्यतत्पर व्हावे असे आवाहन केले यावेळी महेश गुजराथी, हर्षद गांगुर्डे,भरत मेचकुल , विजय काळे यांची भाषणे झालीत तर सुत्रसंचालन प्रा. योगेश वाघ यांनी केले. स्व. रमेश आहेर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ठ कार्यगौरव पुरस्कार विजय काळे यांना देण्यात आला तर त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार महेंद्र गुजराथी, सुनिल काळे, आंनद बडोदे, विकी गवळी, बाळासाहेब बच्छावसर , विक्रम देवरे, कैलास विश्र्वनाथ सोनवणे , कैलास सोनवणे, मधूर गुजराथी, राम बोरसे, सोमनाथ जाधव, पिंटू राऊत, श्रध्दा कोतवाल,उदय वायकोळे,धनंजय वावधाने, सचीन हिरे, नानासाहेब आहेर, नितीन फंगाळ,योगेश अजमेरा, धनंजय पाटील आदिसह पत्रकाराचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

———————————
चांदवड येथे स्व. जयचंद कासलीवाल ट्रस्ट तर्फे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात भूषण कासलीवाल,यशवंत पवार, विष्णु थोरे, वर्धमान पांडे, महेश गुजराथी, विजय काळे, भरत मेचकुल व चांदवड तालुक्यातील पत्रकार बांधव दिसत आहेत.

पत्रकार -

Translate »