राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज..⛈️⛈️
बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे व राज्यात सध्या थंडी कमी आहे.नैर्ऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.राज्यातील काही भागात आज पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने आज आणि उद्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या पावासाचा अंदाज व्यक्त केला आहे.सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या काही भागांत रविवारी (ता. ७) सायकांळी पावसाचा शिडकावा झाला असून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.