तुरीला या हंगामातील सर्वांधिक उच्चांकी भाव! तुरीचे भाव पोहोचले दहा हजार रुपयांवर..

तुरीला या हंगामातील सर्वांधिक उच्चांकी भाव मिळाल्याचे दिसत आहे. तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात तुरीच्या दरात चारशे रुपयांची सुधारणा झाली. गुरुवारी (ता. २५) नवीन तुरीला ८९०० ते ९७०० रुपये दर मिळाला आता दर दहा हजारांच्या पुढे गेले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांत तुरीच्या दराच्या सुधारणा होत आहे आहे. यवतमाळ खासगी बाजार समितीत ८९०० ते ९७०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे तुरीला भाव मिळतो आहे.

येत्या काही दिवसांत तुरीचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता कृषी अभ्यासकांनी वर्तविली आहे. तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सर्वच बाजारांत तुरीला चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठवड्यापासून तुरीच्या दरात सुधारणा कायम असून तुरीचे उत्पादन घटल्याने आणखी दरवाढीची शक्यता आहे. सध्या तुरीचे दर दहा हजार रुपयांवर पोहोचले आहेत.अम्रावतीतील बाजारांमध्ये सध्या नव्या तुरीची होणारी आवक जेमतेम आहे. दोन आठवड्यांनंतर त्यात वाढ होण्याची शक्‍यता असली तरी दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे संकेत आहेत.सध्या शासनाकडून हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. परंतु बाजारात दर जास्त असल्याने या नोंदणीला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

पत्रकार -

Translate »