मानवस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिघवद येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

0

दिघवद वार्ताहर- (कैलास सोनवणे):

मानवस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिघवद येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले..
मानवस्पर्श सेवाभावी संस्था, लासलगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने कै. सोपान (काका) सिताराम देवढे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिघवद शाळेतील १३५ विद्यार्थ्यांना हासुरे इंग्रजी प्रायमर , मराठी सचित्र बालमित्र अंकलिपी , कलरपेटी, पेन्सिल, खोडरबर इ. शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.


संस्थेने २०१६ पासून “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविले असून शहिद जवान कुटुंब, समाजातील गरीब, दिव्यांग,गरजू व्यक्ती, दिपावली फराळ वाटप, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य, कोरोनाग्रस्त रुग्ण, अमरधाम स्वच्छ्ता व दीपोत्सव , वयोवृद्ध निराधार दांपत्य यांना मदत करण्यात आली.मानवाला दुःखातून सावरण्यासाठी आधार देण्याचे कार्य संस्थेच्या वतीने अविरतपणे सुरू आहे. आजपर्यंत संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२१ पासून २१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.सुनिल देवढे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली .संस्थेचे विश्वस्त प्रा.अरुण देवढे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच, शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रकाश बंजारा यांनी संस्थेच्या उपक्रमासाठी व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देवून बहुमोल मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमर मापारी (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती) यांनी भूषविले .
संस्थेचे अध्यक्ष केशवराव जाधव, उपाध्यक्ष योगेश न्याहरकर, सचिव प्रा.सुनिल देवढे , खजिनदार सूर्यकांत जाधव विश्वस्त प्रा.अरुण देवढे , तसेच, गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन नारायण गांगुर्डे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गोविंद मापारी, सदस्य प्रकाश मापारी,नामदेव मापारी, योगेश मापारी , शिक्षणतज्ञ संदिप गांगुर्डे, नितिन कुलकर्णी, सागर गांगुर्डे दिपक मापारी हे मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी अनंत सोमवंशी (अमेरिका), ज्ञानेश्वर शिंदे(पुणे), कार्याध्यक्ष ऍड.सुनिल वाघचौरे, विश्वस्त समीर देवढे, ज्ञानेश्वर देवढे, सुरेखा देवढे, सोपान जाधव, सभासद गोरख देवढे , प्रताप आढाव ,सचिन शेलार , नवनाथ कोकणे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक प्रकाश बंजारा यांनी तर आभार धिरज पवार यांनी मानले.
कार्यक्रमासाठी शिक्षक प्रकाश बंजारा,धीरज पवार,अलका बोरसे, संगीता महाले यांनी विशेष सहकार्य केले तसेच, कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »