जिवाणू खताची कार्यपद्धती/ नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंची कार्यपद्धती:- 

अ)सहजीवी पद्धत:-

1)हे जिवाणू द्विदल वनस्पतीच्या मुळावर गाठी तयार करून त्यामध्ये राहतात. त्यांना लागणारे अन्न वनस्पती कडून मिळते तसेच वनस्पती बरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्राची स्थिरीकरण करतात.

2)सहजीवी पद्धतीत रायझोबियम,ॲझोला, निळे हिरवे शेवाळ यांचा समावेश होतो.

1) रायझोबियम:-

1) सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करते.

2)हे जिवाणू शेंगवर्गीय पिकाच्या मुळावर गाठी निर्माण करतात. हवेतील नत्र शोषण घेऊन मुळावाटे पिकांना उपलब्ध करून देतात.

3) शेंगवर्गीय द्विदल पिकासाठीच हे खत वापरावे.

4) रायझोबियम चे सात गट असून त्या सात गटानुसार वेगवेगळे खत पिकांना वापरावे.

2)ॲझोला:-

 1)ॲझोला ही पाण्यावर  तरंगणारी पान वनस्पती आहे.

2)अतिशय थोड्या अन्नावर चांगली व झपाट्याने वाढते 3)ॲझोला वनस्पतीच्या पेशीत ॲनाबिना ॲझोली नावाची निळे हिरवे शेवाळ हवेतील नत्र वायू स्थिर करून अझोला व शेवाळ सहजीवी पद्धतीने जगतात. 4)शेवाळाने स्थिर केलेला नत्र ॲझोला मध्ये साठविला जातो. 5)ॲझोला मध्ये नत्र 5%असते यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो लवकर कुजतो.

6)भारतात ॲझोला पिनाटा ही जात सर्वत्र आढळते ॲझोलाचे हिरवळीचे खत भात शेतीसाठी फारच उपयुक्त आहे.

7)भात खाचरात चिखलणीच्या वेळी भात लागणीनंतर एक आठवड्यांनी ॲझोला भातशेतीस टाकतात.

8)ॲझोला हेक्टरी 80 ते 100 किलो नत्र मिळून देते.

3)निळे हिरवे शेवाळ:-

1)हे एकपेशीय,फांद्यासह, फांद्या विरहित तंतू असतात.

2)शेवाळा मध्ये ॲलोसिरा,टाॅली पोट्रिक्स,नॉस्टॉक व ॲनाबेना यांचा समावेश होतो.

3)भात शेती खाचरात पाण्यामुळे वाढ होते व वाढ चांगली होऊन भात शेतीला उपयुक्त ठरते.

ब) असहजीवी पद्धत:- “जमिनीमध्ये स्वतंत्र स्थितीत राहून वनस्पतीच्या सहयोगाशिवाय हवेतील मुक्त नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंच्या क्रियेला असहजीवी नत्र स्थिरीकरण असे म्हणतात”.

1)ॲझोटोबॅक्‍टर:-

1)हे जिवाणू मातीत स्वतंत्रपणे राहतात. 

2)मुक्त नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचे ऑक्सिजन वापरण्याच्या क्रियेवरून मुख्य तीन गट पडतात.

3)सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगतात.

4)हवेतील नत्र वायूचे अमोनिया मध्ये रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात.

5)ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीत जिवाणूंचे कार्य चांगले चालते.

6)बायजेरिंक शास्त्रज्ञाने प्रथम ॲझेटोबॅक्टर क्रोकोकम,ॲझेटोबॅक्टर अजेलीस या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा शोध लावला.

7)हे खत एकदल व तृणधांन्यासाठी वापरतात.

8)नत्रस्थिर करण्या व्यतिरिक्त जिब्रेलिक ॲसिड, विटामिन बी, इंडोल ॲसिटिक ॲसिड ही संप्रेरके जमिनीत सोडतात.

9) बुरशीरोधक द्रव जमिनीत सोडतात त्यामुळे अल्टरनेरिया, हेल्मिन्थोस्पोरीयम, फ्युजारियम या अपायकारक बुरशीचा नाश करते.

2)बायजरिंकिया:- हे जिवाणू ॲझोटोबॅक्‍टर जिवाणू प्रामाणिक काम करते. मुख्यत्वे आम्लधर्मीय जमिनीत जास्त आढळून येते.

3) ॲसोटोबॅक्टर:- ऊस शर्करायुक्त पिकात मुळावाटे प्रवेश करून नत्राची स्थिरीकरण करतात त्यामुळे या जिवाणूंना अंतरप्रवाही जिवाणू असेही म्हणतात.

क) सहसहजीवी पद्धत:- “वनस्पतीच्या सानिध्यात राहून मुक्त नत्राचे स्थिरीकरण मातीत करतात त्यास सहसहजीवी नत्र स्थिरीकरण म्हणतात”.

1) ॲझोस्पायरीलम:-

1)ॲझो म्हणजे नत्र व स्पायरीलम म्हणजे नागमोडी आकार यावरून ॲझोस्पायरीलम नत्र स्थिर करणारे नागमोडी जिवाणू होय.

2) हे सहसहजीवी पद्धतीने हवेतील मुक्त नत्र तृणधांन्य च्या किंवा गवताच्या मुळामध्ये व मुळांभोवती मातीत स्थिर करतात.

2)त्यामुळे या जीवाणू चे वास्तव्य मुळांवर जास्त असते.

3)स्थिर केलेला नत्र कार्यक्षमरित्या झाडे मुळावाटे शोषण करूण घेऊ शकतात.

 4)ॲझोटोबॅक्‍टर पेक्षा दीड ते दोन पट जास्त नत्र स्थिर करण्याची व झाडाला पुरवण्याची कार्यक्षमता या जिवाणू मध्ये आहे.

पत्रकार -

By admin

Translate »