Yeola : येवला शहरातील पाणीपुरवठा ठप्प,साठवण तलावाने गाठला तळ..

राज्यात दुष्काळ वाढतोय,दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे.मार्चअखेरच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरवात केली आहे.येवला. तालुक्यातील पाटोदा येथील साठवण तलाव कोरडाठाक पडला आहे.पाहिजे तितका पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली आहे.शहरातील बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे, ही येवलेकरांची शोकांतिका आहे.

साठवण तलावातील पाणीसाठा पूर्णच कमी झालेला असून येवला शहरास पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.साठवण तलावाने गाठला तळ असून तलावाचा तळ उघडा पडला आहे.अन्यथा पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार असल्याची चिन्हे आहेत.

पत्रकार -

Translate »