Land Survey : आता शेतीची अचूक मोजणी होणार; बांधावरून भावकीचे आपापसांत वाद मिटणार..
बांधावरून भावकीचे आपापसांत वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही.भूमिअभिलेख विभागाला रोवर युनिट मशिन प्राप्त झाले आहेत.रोवरने जमीन मोजणी गतीने होणार आहे .त्यामुळे शेत जमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तत्काळ मोजणी करता येऊन जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होणार आहे.सध्याच्या घडीला राज्यातील 106 तालुक्यांमध्ये या ‘ई-मोजणी 2.0’ प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे सुरू आहेत. चालू वर्ष अखेरपर्यंत ही ‘ई-मोजणी 2.0’ योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी केल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना मोबाईलवरच हे जमीन मोजणी नकाशे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
बांधावरून भावकीचे आपापसांत वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीचे तंतोतंत अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. मशिनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते.परिणामी जमिनीची अचूक मोजणी होऊन, शेतकरी आणि जमीन धारकांमधील वाद कमी होण्यास मदत होणार आहे.भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार असून, शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
वाचा याबाबतचा संपूर्ण जीआर 👇👇