चंद्रपूर : माजरीमध्ये महाप्रसादामुळे १२५ जणांना विषबाधा..
माजरी, चंद्रपूर येथे कालीमाता मंदिरात आयोजित महाप्रसाद समारंभातून जवळपास १२५ भाविकांना विषबाधा झाली आहे. या दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
विषबाधित व्यक्तींमध्ये ६ पुरुष, ३० महिला आणि २४ लहान मुले यांचा समावेश आहे.घटना शनिवार, १३ एप्रिल २०२४ रोजी कालीमाता मंदिर, माजरी, चंद्रपूर येथे रात्री घडली.
बाधित जवळपास १२५ भाविक असून गंभीर ६ इतर ३० महिला, २४ लहान मुले यांचा समावेश आहे.
सर्व बाधित व्यक्तींना तातडीने उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गंभीर अवस्थेतील ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना ८० वर्षीय गुरुफेन यादव यांचे निधन झाले आहे.
या विषबाधेमागे काय कारण आहे याचा तपास सुरू आहे.
अन्न विषबाधा झाल्याची शक्यता आहे.चंद्रपूरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६९ विषबाधित रुग्णांपैकी ६ जणांना गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापैकी ८० वर्षीय गुरुफेन यादव यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना इतरही आजार होते.
चंद्रपूरमध्ये हलविण्यात आलेल्या रुग्णांमध्ये ५ वर्षीय आर्यन राजपूत, ५ वर्षीय अभिषेक वर्मा, आशय राम (वय अस्पष्ट), दीड वर्षीय सोमय्या कुमार, अडीच वर्षीय देवांश राम आणि ८० वर्षीय गुरुफेन यादव यांचा समावेश आहे.
माजीरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात १० आणि वेकोलीच्या रुग्णालयात २५ ते ३० विषबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्ण चंद्रपूर आणि वणी येथेही गेले आहेत. त्यामुळे विषबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.