Irrigation Management : ‘आयओटी’ प्रमाणे प्रत्यक्ष वेळेवरील सिंचन व्यवस्थापन
Irrigation Management : ‘आयओटी’ प्रमाणे प्रत्यक्ष वेळेवरील सिंचन व्यवस्थापन
आपल्या शेतीमध्ये पिकाच्या लागवडीवेळीच वरील पैकी कोणती पद्धत सिंचनासाठी वापरणार हे ठरवून तशी यंत्रणा बसवून घ्यावी. आता पुढील महत्त्वाचे काम पिकास पाणी केव्हा (वेळ) आणि किती (प्रमाण) द्यावयाचे हे निश्चित करणे होय.
• पाणी कसे द्यावे?
• पाणी केव्हा द्यावे?
• पाणी किती द्यावे?
या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सिंचनासाठी आपण वापरणारी पद्धत होय. अधिक कार्यक्षम व्यवस्थापनासाठी आधुनिक सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. उदा. तुषार, ठिबक, सूक्ष्म तुषार इ.
आपल्या शेतीमध्ये पिकाच्या लागवडीवेळीच वरील पैकी कोणती पद्धत सिंचनासाठी वापरणार हे ठरवून तशी यंत्रणा बसवून घ्यावी. आता पुढील महत्त्वाचे काम पिकास पाणी केव्हा (वेळ) आणि किती (प्रमाण) द्यावयाचे हे निश्चित करणे होय.
हे ठरवावे लागते ते पुढील चार घटकांवर.
१) जमीन व जमिनीचा प्रकार (महत्त्वाचे म्हणजे जमिनीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता)
२) पीक व पिकाच्या वाढीची अवस्था
३) जमिनीतील ओलाव्याचे (आधीचा ओलावा किंवा पावसामुळे वाढलेला ओलावा आणि आपण सिंचनाद्वारे दिलेले पाणी यांचे) होणारे बाष्पीभवन
४) पिकाच्या दैनंदिन गरजेसाठी आवश्यक पाणी (पर्णोत्सर्जन)
पीकवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे पर्णोत्सर्जन अधिक बाष्पीभवन (एकत्रितपणे त्याला बाष्पपर्णोत्सर्जन असे म्हणतात.) या प्रक्रियेवर हवामानातील घटकांचा परिणाम होतो. उदा. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाश, पाऊस इ.
म्हणून आपले सिंचन व्यवस्थापन हे हवामानातील घटकांवरही अवलंबून असते. सिंचनाची वेळ, प्रमाण ठरविण्यासाठी वरील चार घटकांसोबतच हवामानातील घटकांचाही विचार करावा लागतो.
कारण यातील जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, हवामानाचे घटक व सिंचन प्रणालीची कार्यक्षमता या बाबी स्थान आणि वेळेप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे त्यांची सविस्तर माहिती घेऊ.
धन्यवाद
🙏🙏🙏