Monsoon Update : मॉन्सून ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस..

भारतीय हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे की, नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. हे सरासरी तारखेपेक्षा एक दिवस आधी आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ दिवस लवकर आहे.IMD ने अंदाज वर्तवला आहे की, यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 106% पावसाची शक्यता आहे.याचा अर्थ सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मॉन्सून आगमनाचा अंदाज लावण्यासाठी खालील सहा घटकांचा विचार केला जातो:
वायव्य भारतातील किमान तापमान
दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्व-मान्सून पावसाचे प्रमाण
चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग
आग्नेय हिंद महासागरातील खालच्या पातळीवरील वारे
वायव्य प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचा हवामान दाब
ईशान्य हिंद महासागरातील वरच्या पातळीवरील वारे

मॉन्सून हंगामात ‘ला-नीना’ स्थिती आणि ‘सकारात्मक'(पॉझिटिव्ह) इंडियन ओशन डायपोल (आयओडी) असण्याची शक्यता आहे.IMD मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामासाठी अधिकृत अंदाज आणि विभागानुसार पावसाचे वितरण जाहीर करेल.

मागील वर्षांमधील मॉन्सून आगमन: (केरळातील आगमन)
वर्ष आगमनाचा अंदाज प्रत्यक्ष आगमन
2019 – 6 जून… 8 जून
2020 – 5 जून…1 जून
2021 – 31 मे… 3 जून
2022 – 27 मे…29 मे

पत्रकार -

Translate »