मनमाडमधील युनियन बँकेतील विमा प्रतिनिधीने ठेवीदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला!
मनमाडमधील युनियन बँकेतील एका विमा प्रतिनिधीने शेकडो मुदत ठेवीदारांना फसवून करोडो रुपयांचा अपहार केला आहे.
आरोपी विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवी आणि नूतनीकरणासाठी दिलेले चेक स्वतःच्या नावावर वटवून पैसे अपहृत केले.या प्रकरणामुळे संतप्त ठेवीदारांनी बँकेसमोर आंदोलन केले आहे.बँकेने चौकशी पथक नेमून गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली असून, ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी दिली आहे.
आरोपी विमा प्रतिनिधीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली आहे.आरोपी विमा प्रतिनिधीचे नाव सुभाष देशमुख आहे.बँकेने या प्रकरणाची चौकशी चार जणांच्या समितीकडे सोपवली आहे.
बँकेमार्फत संबंधित विमा प्रतिनिधी विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात १ कोटी ३९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी मोठी असून शकते. हा आकडा २५ कोरोड रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.देशमुख हा बँक प्रतिनिधी म्हणून बँकेत बसलेला असायचा असे ठेवीदार सांगतात.बँकेच्या सांगण्यावरूनच आम्ही त्याला आमच्या ठेवी देत होतो. कधी प्रिंटर बंद आहे तर कधी वेळ लागणार आहे असे सांगून तो पोचपावत्या देत नव्हता असेही ठेवीदार सांगत आहे. कोणी दोन लाखाची तर कोणी ४५ लाखा पर्यंतचीही ठेव त्याच्याकडे ठेवली होती. मात्र ते पैसे तो परस्पर घेऊन फरार झाला आहे.आपल्या आयुष्याची पुंजी बँकेत सुरक्षित रहावी म्हणून ठेवली होती. पण त्याच्यावरच डल्ला मारल्याने हे ठेवीदर हबकले आहेत. ठेवीदारांनी आपले पैसे परत मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.
हे प्रकरण बँकिंग व्यवस्थेतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करते.