ओम नितीन गांगुर्डे यांची कॅप्टन पदी पदोन्नती
काजीसांगवी: (उत्तम आवारे):- चांदवड तालुक्यातील काजी सांगवी येथील डॉ. नितीन गांगुर्डे व डॉ. सुमन नितीन गांगुर्डे यांचे चिरंजीव कॅप्टन ओम नितीन गांगुर्डे यांची कॅप्टन पदी पदोन्नती झाली
कॅप्टन ओम नितीन गांगुर्डे यांचे शिक्षण दहावी पर्यत शिक्षण नेमिनाथ जैन विद्यालय चांदवड येथुन झाले व अकरावी व बारावी तसेच एन डी ए परिक्षेची तयारी छत्रपती संभाजी नगर येथील एस पी आय येथे केली नंतर NDA ची परीक्षा NDA ही UPSC परीक्षा आहे बारावीला पहिल्या प्रयत्नात उतिर्ण करुन नंतर तिन वर्ष खडकवासला येथे प्रशिक्षन घेतले नंतर एक वर्ष देहरादून येथे प्रशिक्षन पुर्ण केले .
प्रशिक्षना नंतर त्याची निवड अर्टिलरी ह्या क्षेत्रात झाली .
दोन वर्ष लेप्टनंट म्हनुन सर्वीस केल्या नंतर आज कॅप्टन म्हनुन नियुक्ती झाली आहे