Nashik: नाशिक जिल्ह्यात पेरणी सुरू; शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग

0

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला सुरवात केली आहे.

मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी आता खरिपाच्या मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी सुरू केली आहे. शेती करताना मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढू लागला आहे. बैलांच्या किमती सर्वसाधारण शेतकऱ्यांच्य आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील पशुधनाची संख्या घटत आहे. यावर उपाय म्हणून ट्रॅक्टरने शेतीची मशागत व पेरणीची कामे करावी लागत आहेत.

यावर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज

हवामान खात्याने दिला होता. त्या प्रमाणे यंदाच्या पावसाळ्याचा ट्रेलर देखील नाशिक जिल्ह्यात चांगला पहावयास मिळाला.नाशिक जिल्ह्यात 7 जून रोजी मान्सून आगमन झाले.काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे, तर काही अद्यापही वाट पाहत आहेत.जिल्ह्यातील 70% शेतकरी पेरणी करावी की नाही या संभ्रमात आहेत.कृषी अधिकारी शेतकऱ्यांना तात्काळ पेरणी टाळण्याचा आणि जमिनीत पुरेसा ओलसरपणा आल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला देत आहेत.

शेतकऱ्यांसाठी सूचना:

यावर्षीचा पारा कधी नव्हे इतका ४० अंशावर गेल्याने जमिनीची तहान अजून भागलेली नाही.हवामान अंदाजावर लक्ष ठेवा आणि त्यानुसार आपली योजना आखा.जमिनीला अजून पुरेसा पाऊस झाला नाही.
पेरणी करण्यापूर्वी 4 ते 5 इंच ओलसरपणा आवश्यक आहे.

६ लाख हेक्टरवर होणार पेरणी

यंदा नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्यांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषी तसेच युरिया साडेआठ हजार टन बफर स्टॉक करून ठेवल्यामुळे खतांची टंचाई जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. खरीप हंगामासाठी २ लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »