विश्वगुरु संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान…*

0

त्र्यंबकेश्वर (नाशिक)(कैलास सोनवणे):- वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्यदिव्य स्वरूपात आज दि. २० जून २०२४ रोजी दुपारी ०२ वाजता हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांचे आराध्यदैवत ब्रह्मांडनायक पंढरीश पांडुरंग परमात्माच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वरहुन पंढरपूरकडे रवाना झाले या भव्य दिव्य स्वरूपात हा नयनरम्य सोहळा संपन्न झाला सम्पूर्ण महाराष्ट्रातील मानाचे पालखी सोहळे व असंख्य वारकरी,भाविक,भक्त व दिंड्या घेऊन पायी वारी करत पंढरपूरला जातात, त्यात मानाच्या तिसऱ्या क्रमांकाची पालखी अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज यांची होय, भक्तिमय वारकऱ्यांच्या समवेत व  विश्वगुरू श्रीनिवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधि संस्थान त्र्यंबकेश्वर ते कुशावर्त मार्गे आद्यजोतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या कलशदर्शन घेऊन दिवसाच्या प्रवासासाठी “निवृत्तीराया,निवृत्तीराया । सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया ।।” व “ज्ञानोबा तुकाराम” चा वारकरी भाविकभक्त गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवनार आहेत, आज सायं ०५:३० वाजता गुरुगृही अर्थात “गहिणीप्रसादे निवृत्ती दातार ।।” या अनुग्रहांनव्ये श्री निवृत्तिनाथ महाराज यांचे गुरु गहिनीनाथ यांच्या समाधि स्थळी अर्थात महानिर्वाणी आखाडा,पेगलवाडी त्र्यंबकेश्वर येथे पहिला मुक्कामाच्या ठिकाणी विसवला.हरिपाठ, किर्तन भाविक भक्त त्र्यंबककरांच्या वतीने भव्य महाप्रसाद आयोजन केले आहे यावर्षी प्रतिवर्षापेक्षा भावीकांचा जास्तीत जास्त सहभाग जाणवला,त्यात आज त्र्यंबकेश्वर नगरीत प्रस्थान दरम्यान पर्जन्य देवतेने ही हजेरी लावली.
यावर्षी महाराष्ट्र शासनाने संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी व श्री तुकोबांराय महाराज देहू पालखी सोहळ्याप्रमाणे आवश्यक निधी अंतर्गत निवृत्तिनाथ महाराज ,सोपानदेव महाराज,आदीशक्ती मुक्ताई  महाराज या तिन्हीही संस्थान पालखी सोहळ्याचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समावेश केल्याबद्दल मी विश्वस्त नात्याने तमाम वारकऱ्यांच्या व संस्थानच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानतो.शासन व संस्थान संयुक्त विद्यमाने निर्मलवारी,वाँटरप्रूफ मंडप,जनरेटर व्हॅन,वैदयकीय सेवा,ॲम्बुलन्स, वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा यासारख्या दैनंदिन सुविधा देणार आहे या
२७ दिवसाच्या खडतर प्रवास पण देवाच्या नामस्मरनात सर्वांना आनंदमय होईल.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे,देवळालीच्या आमदार सरोजताई अहिरे,माजी आमदार बबनराव घोलप,माजी आमदार निर्मला गावित,शिवसेना आध्यत्मिक सेनेचे अक्षय भोसले,भाजपा आध्यत्मिक सेनेचे तुषार भोसले,लक्ष्मण सावजी,शिवाजी चुंबळे त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक आदी उपस्थित होते,संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर च्या अध्यक्ष सौ.कांचनताई सतीश जगताप,सचिव अमर ठोंबरे पालखी सोहळा प्रमुख श्री नारायण मुठाळ,निलेश गाढवे,सोमनाथ घोटेकर,श्रीपाद कुलकर्णी,राहुल साळुंके,जयंत गोसावी, योगेश गोसावी, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे,मुख्याधिकारी श्रिया देवचक्के व श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान माजी अध्यक्ष, विश्वस्त,पदाधिकारी,मानकरी,विणेकरी,चोपदार  आदी यांचा सत्कार समारंभ येथे पार पडला

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, वारकऱ्यांचे कैवारी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची इतिहासात प्रथमच सदिच्छा भेट…यावेळी त्यांचा सन्मान करताना संस्थानचे अध्यक्ष सौ.कांचनताई जगताप,चांदवड तालुक्याचे वैभव,युवाकिर्तनकार विश्वस्त व प्रसिद्धीप्रमुख आमचे जीवलग मित्र ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, सचिव श्री अमर ठोंबरे यावेळी नाशिकचे पालकमंत्री ना.दादाजी भुसे साहेब नाशिकचे माजी खासदार श्री.हेमंत आप्पा गोडसे,संस्थानचे माजी अध्यक्ष श्री.निलेश महाराज गाढवे, माजी सचिव सोमनाथ घोटेकर,विश्वस्त श्री राहुल महाराज साळुंके,श्री.श्रीपाद महाराज कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »