Hailstorm Crop Damage : पाऊस, गारपीट नुकसानीच्या सव्वादोन लाख सूचना

0

Hailstorm Crop Damage : पाऊस, गारपीट नुकसानीच्या सव्वादोन लाख सूचना

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्याबाबत पीकविम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत अंदाजे सव्वादोन लाख सूचना दाखल केल्या आहेत.
Crop Damage News पुणे : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान (Hailstorm Crop Damage) झाल्याबाबत पीकविम्याची (Crop Insurance) नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत अंदाजे सव्वादोन लाख सूचना दाखल केल्या आहेत.
दरम्यान, भरपाईपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना बजावले आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकात नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी १.६० लाखाहून अधिक सूचना दाखल केल्या आहेत. तसेच, काढणीपश्चात नुकसानीच्या घटकासाठी ५६ हजारांपेक्षा जास्त सूचना आलेल्या आहेत.
विमा कंपन्यांना आयुक्तालयाने एक तातडीचे पत्र पाठवले आहे. ‘‘नुकसान भरपाई प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवावी. तसेच, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची काळजी घ्यावी,’’ असे कंपन्यांना सांगितले गेले आहे.
राज्यात १ मार्च ते २२ मार्च या दरम्यान अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बहुतेक सर्व प्रकारातील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमा योजनेच्या कक्षेत सर्व पिके समाविष्ट नाहीत. त्यामुळे योजनेच्या बाहेरी पिकांना भरपाई मिळणार नाही.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »