दिघवद विद्यालय परिसरात माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण.

0


वार्ताहर (कैलास सोनवणे) श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय परिसरात इयत्ता दहावी सन -2001-2002 बॅच कडून वृक्षारोपण करण्यात आले.
आवडते मज मनापासूनी शाळा!लावीते लळा जशी माऊली बाळा!
ह्या ऊक्ती प्रमाणे शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांच्या नंतर संस्काराची शिदोरी देणारी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. आपण ज्या शाळेत शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आजही आपल्या आयुष्यातून जात नाही हे सत्य आहे. ह्याच पार्श्वभूमीवर शाळेबरोबर असणारे आपले ऋणानुबंध अधिक दृढ व्हावे. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचा परिसर निसर्गरम्य व्हावा या उद्देशाने या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने वृक्षारोपण कार्यक्रमाच नियोजन केलं. शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक संस्थेचे अध्यक्ष,चिटणीस व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शंकर रसाळ, संदिप पाटील,सुनील गांगुर्डे साहेबराव वाघ,प्रशांत मापारी धनंजय गांगुर्डे, बापू (विक्रम) मापारी, विक्रम मापारी,शंकर घोलप, भाऊसाहेब गांगुर्डे,वैभव निंबाळकर,रामदास हांडगे, शरद गांगुर्डे,विठ्ठल ठाकरे,डॉ विलास झाल्टे,वैशाली पवार, दीपक सोनवणे, प्रकाश गायकवाड,विजय चव्हाण, बापू जाधव,समाधान शिंदे आदी माजी विद्यार्थ्यांनी केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम महादु पेंढारी,पर्यवेक्षक इंद्रभान देवरे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कारभारी रसाळ चिटणीस अण्णासाहेब भागुजी गांगुर्डे,खजिनदार विठ्ठल शंकरराव गांगुर्डे, शाळा समिती अध्यक्ष एस. के. अण्णा,संचालक शिक्षक सदाशिव दोधू गांगुर्डे, नानासाहेब निवृत्ती गांगुर्डे  सर्व संचालक, ग्रामस्थ दिलीप मापारी, विष्णू गांगुर्डे या सर्वांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »