भोयेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पंढरीनाथ बोरसे

0


दिघवद, वार्ताहर (कैलास सोनवणे): भोयेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व विद्यमान संचालक मंडळाची सभा सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करता अध्यासी अधिकारी किशोर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात चेअरमन पदासाठी पंढरीनाथ नाना बोरसे तर व्हाईस चेअरमन पदासाठी सचिन बाळू ठोंबरे यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. सदर निवड प्रसंगी उत्तम भागुजी ठोंबरे, दादा रावजी ठोंबरे, शिवाजी गंगाधर गलांडे, गोविंद ममताजी निकम, लक्ष्मण निवृत्ती ठोंबरे, भाऊराव यशवंत ठोंबरे, कैलास देवराम ठोंबरे, आशा भास्कर ठोंबरे, शकुंतलाबाई निकम या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांसह साहेबराव ठोंबरे, एकनाथ बोरसे, नारायण गलांडे, नामदेव ठोंबरे, संपत गलांडे यांचेसह भोयेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन पंढरीनाथ बोरसे व व्हाईस चेअरमन सचिन ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »