संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचे वांबोरीत स्वागत

0

नाशिक / नगर ( कैलास सोनवणे): मानाच्या पालखी सोहळ्यात अत्यंत महत्वाचे स्थान अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असणारे संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचा आज दुपारचा विसावा वांबोरी ता राहुरी येथे झाला यावेळी येथील वारकरी नारायण महाराज पागिरे यांनी स्वागत करून पालखीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे रेशमी झालर व बैलासाठी  अर्पण  म्हणून देण्यात आली सायं १ जुलै सोमवार रोजी सायं ०६ वाजता डोंगरगण ता नगर जि अहमदनगर येथे १२ व्या दिवसाच्या मुक्कामी अर्थात हिरव्यागार डोंगरगणच्या घाटात वारकरीमय वातावरणात निवृत्तीनाथांच्या हरीनामाचा जयघोषात घाट चढून सर्व वारकरी डोंगरगण येथे आले.घाटातील दृश्य अतिशय जसे की निसर्गाने वारकऱ्यांच्यासाठी जणू काही शीतल छायेची छत्री धरल्यासारखी सावलीमय हिरवळमय वारकरीमय भक्तिमय वातावरण वारकऱ्यांच्यासाठी झाले होते.या पालखीमध्ये पारंपरिक ५१ दिंड्या आणि हजारो भाविक यात सहभागी झाले आहेत. वारकरी भगवी पताका आणि श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिनामाचा जयघोष करत या पालखीचे भव्य दिव्य स्वागत डोंगरगण ता नगर येथे वारकरी संप्रदायाचे जेष्ठ किर्तनकार प.पु.पुंडलिक महाराज जंगले शास्त्री संस्थापित  ज्ञानेश योगआश्रम वारकरी शिक्षण संस्था येथील बाल वारकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ व नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,सहपोलीस निरीक्षक देविदास भालेराव राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,मंडळ अधिकारी नागवडे, ग्रामसेवक सुभाष कापसे,पोलीस पाटील आदिनाथ मते,सरपंच वैशाली मते यांनी या अतिशय भव्य दिव्य स्वरूपात दिंडीचे स्वागत करण्यात आले व पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त आयोजन केले होते यामुळे सर्व वारकऱ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण झाले.


यंदा संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे जन्मोत्सवाचे ७५१ वर्ष यामुळे यावर्षी पालखी सोहळ्यात हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहे.  पायी पालखी सोहळ्यातील दिंडी सोहळा सुककर व व्यवस्थापन चांगले होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या फार मोठ्या सहकार्याने निर्मल वारी, आरोग्यदायी वारी,प्लॅस्टिकमुक्त वारी,स्वच्छतादायी वारी,सुरक्षित वारी याबरोबरच अनेक व्यवस्था करण्यात येत आहे वारकरी व्यवस्थेत इतक्या सोयीसुविधा दिल्या. त्याचाही चांगला फायदा वारकरी भाविकांना होत आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी स्वच्छता,आरोग्य, सुरक्षा आणि पाणी पुरवठा आदी सुविधा दिल्याने पायी दिंडीचा प्रवास आनंददायी व सुखकर होत आहे तरी वारकऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे,रस्ता ओलांडू नये,रस्त्याने पळू नये असे आवाहन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थानच्या अध्यक्षा ह.भ.प.कांचनताई जगताप यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधामुळे वारीच्या मार्गावर होणारी गैरसोय आता दूर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या पालखी सोहळ्यामध्ये डोंगरगण येथील भजनी मंडळ, आणि ग्रामस्थांनी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात यावेळी संस्थांनच्या अध्यक्षा ह.भ.प.कांचनताई सतीश जगताप, पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त राहुल महाराज सांळुखे, विश्वस्त तथा प्रसिध्दीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, पुजारी जयंत महाराज गोसावी, पुजारी अनिल महाराज गोसावी,मानकरी मोहन महाराज बेलापूरकर,बाळकृष्ण महाराज डावरे,निवृत्ती चोपदार,सागर दौंड,कृष्णा रायते, बैलजोडीचे मानकरी अश्वचे मानकरी आदींचा डोंगरगण ग्रामस्थांच्या वतीने वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी MIDC पोलीस स्टेशन व नगर जिल्हा पोलीस प्रशासन व आरोग्या यांची सेवा अत्यंत उत्तम आणि उल्लेखनीय आहे.

वांबोरी ते डोंगरगण हा घाटाचा प्रवास बैलांना ऐवजी त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचा नवा ट्रॅक्टर असेल त्यांना तो मान दिला जातो दरवर्षी नवीन ट्रॅक्टर असेल तो त्यांना तो मान दिला जातो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »