आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर यांच्या तर्फे तालुक्यातील वारकऱ्यांना रेनकोट वाटप

0


  काजीसांगवीः (उत्तम आवारे):-   आषाढी वारीसाठी चांदवड तालुक्यातून दिंडीमध्ये गेल्या चार-पाच दिवसापूर्वी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकरी भिजण्यापूर्वीच वारकऱ्यांना रेनकोट मिळाले. रेनकोट पाहून वारकऱ्यांना सुखद धक्का बसला. दरम्यान यावर्षी विविध पालख्यांद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील वारकऱ्यांना १३०० रेनकोटचे वाटप केले.
   दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे धाव घेतात. परंतु आषाढ महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असतो. त्यामुळे वारकऱ्यांना भर पावसात मार्गक्रमण करावे लागते. या वारीत सहभागी होणारे बहुतांश वारकरी हे शेतकरी, कामगार तसेच मजूर वर्गातील असतात. त्यामुळे बहुतांश वारकऱ्यांना पावसापासून वाचण्यासाठी छत्री किंवा रेनकोट खरेदी करणे परवडणारे नसते. त्यामुळे यावर्षी आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी वारकऱ्यांना रेनकोट देण्याता निर्णय घेतला आहे.
      दरम्यान तालुक्यातील दिंडी सोहळ्यासाठी हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत.  वाटप करताना वरकाऱ्यांसोबत पूजा, आरती, अभंग आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रेनकोट वाटप करण्यात आले  निवृत्तीनाथ महाराज की जय आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे.

      यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, यु मो तालुका अध्यक्ष श्री.शांताराम भवर, ह.भ.प.युवा कीर्तनकार सौरभ महाराज जाधव, श्री.संदीप काळे, श्री.दीपक उशीर, आमदार डॉ.राहुल दादा यांचे स्वीयसहाय्यक श्री.सागर अण्णा अहिरे, श्री.मुकुंद बोरसे, श्री.खुशाल पाटील, श्री.कुणाल अनवट, श्री.मयुर मोरे, श्री.उत्तम आवारे तसेच सर्व वारकरी उपस्थित होते.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »