संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात दुसरे “भव्य गोल रिंगण” चांभार वस्ती,करकंब मध्ये.
वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात दुसरे “भव्य गोल रिंगण” चांभार वस्ती,करकंब येथे होणार
पालखी २३व्या दिवसाच्या दगडी अकोले येथे सोहळा मुक्कामी
सोहळ्यातील तिसरे आणि दुसरे गोल रिंगण
काजीसांगवीः उत्तम आवारे: आज संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे कंदरहुन ता करमाळा येथून सकाळी ७:३० वा टेभुर्णी मार्गेकडे वेणेगावकडे प्रस्थान झाले, सायं दगडी अकोले येथे सोहळा पोहोचला,दगडी अकोले ग्रामस्थांच्यावतीने पालखीचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करून निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.यंदा सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे ७५१वा जन्मोत्सवी वर्ष असून यावर्षी आनंदाने सर्वत्र ठिकाणी साजरे होत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात ५२ दिंडी असून यंदा वारीत वारकऱ्यांची लाखाच्या पुढे उपस्थिती असून हा अत्यंत शिस्तबद्ध चाललेला सोहळा हा नयनरम्य असा पंढरपूरच्या दिशेने उद्या रवाना होईल उद्या दुपारी करकंब येथे होणारे सोहळ्यातील तिसरे व दुसरे गोल रिंगण नियोजनार्थ तातडीची संस्थानतर्फे सर्व मानकरी, सर्व दिंडीप्रमुख,चोपदार,जेष्ठ मार्गदर्शक वारकरी,अश्वाचे मानकरी यांची बैठक आयोजित केली,यावेळी सर्व दिंडीप्रमुख उपस्थित होते त्यात संस्थानच्या वतीने प्रास्ताविक विश्वस्त व प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी केले, त्यानंतर चोपदार सागर दौंड यांनी गोल रिंगण संदर्भात इतमभूत माहिती व काही सूचना सांगितल्या व संस्थानच्या अध्यक्ष सौ कांचनताई जगताप यांनी वारकऱ्यांच्या व दिंडी प्रमुख्यांच्या समस्या जाणून घेतल्या.पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ यांनी सर्व मानकरी व दिंडीप्रमुख व जेष्ठ वारकरी मार्गदर्शक यांचे आभार मानले, चांभार विहीर करकंब येथे उद्या संपन्न होनारे भव्य गोल या रिंगण सोहळ्याच्या जागेची पाहणी करताना संस्थानच्या अध्यक्ष सौ कांचनताई जगताप,सोहळाप्रमुख नारायण मुठाळ ,विश्वस्त राहुल साळुंके, विश्वास्त,प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे व पालखी सोहळ्याचे चोपदार सागर दौंड,गावकरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते सर्वप्रथम जरीपटका गोल रिंगण करेल,नंतर स्वराचा अश्व व देवाचा अश्व गोलाकार दौड करेल नंतर देवाचा प्रसाद घेऊन अश्व पुन्हा स्थानावर येतील सर्व झेंडेकरी यांचे गोल रिंगण होईल.सर्व दिंडीत अनेक खेळ खेळले जातील आणि शेवटी देवाच्या सर्व बाजूने गोलाकार टाळकरी यांचा उडीचा खेळ होईल, त्यानंतर भजन होऊन रिंगण सम्पन्न होईल अशी सूचना चोपदार यांनी दिली.यावेळी सोहळ्याचे मानकरी मोहन महाराज बेलापूर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे,व निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान अध्यक्ष सौ. कांचनताई सतीश जगताप,सोहळाप्रमुख नारायण मुठाळ,विश्वस्त व प्रसिद्धी प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, रामकृष्णदास लहवीतकर,पुंडलिक थेटे,संजय तांबे,ज्ञानेश्वर दाते आदी उपस्थित होते, .अशी माहिती संस्थानचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी दिली.