‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ महा-मेळावा: सर्व कामे एकच छताखाली

दिघवद ( कैलास सोनवणे )निमगव्हान ता चांदवड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मेळाव्या प्रसंगी विभक्त कुटुंब तसेच विविध योजनांसाठी शासनाकडून होणारी शिधापत्रिकांची मागणी लक्षात घेता चांदवड तालुक्यात दहा हजार शिधापत्रिकांचा इष्टांक वाढविला आहेत अशी माहिती आमदार डॉ आहेर यांनी दिली लाडकी बहिण योजनेसाठी इच्छुक महिला लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आमदार डॉक्टर आहेर यांनी एका छताखाली पोस्टात खाते उघडणे आधार दुरुस्ती शिधापत्रिका मध्ये नाव समाविष्ट करणे व नाव कमी करणे या सुविधा राबविल्याने महिलांची मोठी गैरसोय दूर झाली आहे सर्व कामे एका छताखाली होत असल्याने महिलांचा प्रतिसाद वाढला आहेत आज 2589 अर्धा चे वाटप केले तर 1278 ऑनलाईन भरून घेण्यात आले यावेळी डॉक्टर आहे बोलले की लाडकी बहीण योजनेसाठी पीएम किसान चा लाभ घेणाऱ्या महिला ही पात्र आहेत वाहेगाव साळ गणात 6000 महिला योजनेसाठी पात्र ठरणार आहे असून चांदवड तालुक्यात ही योजना राबवली तर दरमहा तालुक्यासाठी दहा कोटी रुपया पर्यंत अनुदान मिळू शकते जिल्ह्यात सर्वात योजनेसाठी चांदवड तालुका असल्याचे आमदार आहेर म्हणाले या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून विरोधक बहीण भाऊ असा भेद करत आहेत शिधापत्रिका वाढी बरोबरच धान्य कोटा ही वाढवल्याने शिधापत्रिका धारकांना दाणे मिळणार आहेत यावेळी दिघवद येथील कमलबाई पाटील व पहाटे येथील रंजनाबाई चव्हाण या दोन्ही अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आमदार डॉक्टर आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे नायब तहसीलदार खेडकर तालुका अध्यक्ष मनोज शिंदे बाळासाहेब माळी युवा मोर्चा अध्यक्ष शांताराम भवर महिला तालुकाध्यक्ष गीताबाई झालटे वाल्मीक वानखेडे डॉक्टर नितीन आहेर पिंटू भोईटे अमर मापारी कैलास गुंजाळ केशव खरे बाळासाहेब वाघ पंढरीनाथ खताळ देविदास आहेर गणपत ठाकरे दीपक भोईटे अरुण दवंडे मन्सूर मुलानी कैलास पवार बबन दरेकर साईनाथ कोल्हे किरण मापारी आदी सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

