Mango Market : वाशीत ६० हजार आंबा पेटी आवक

0

Mango Market : वाशीत ६० हजार आंबा पेटी आवक

पाडव्याच्या मुहूर्तावर आवक वाढली; डझनाला हापूस ४०० ते १२०० रुपये

रत्नागिरी ः गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर वाशी येथील बाजार समितीत विविध प्रकारच्या आंब्यांची आवक (Mango Arrival) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा गुडीपाढव्याला अधिक पेट्या दाखल झाल्या आहेत. बुधवारी (ता. २२) सुमारे ६० हजार ८६८ आंबा पेट्या मार्केटमध्ये (Mango market) आल्या. यामध्ये कोकणातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील ४८ हजार पेट्यांचा समावेश आहे.

त्यात देवगडीमधील सर्वाधिक ६० टक्के, रत्नागिरीतील वीस टक्के आणि रायगड, वेंगुर्ला व बाणकोटमधून उर्वरित वीस टक्के आंबा जातो. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमधून वाशीत सुमारे १२ हजार पेट्या आल्या आहेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत कोकणातील बागायतदार व्यावसायिक दृष्टिकोन पाहून आंबा लवकरात लवकर बाजारात आणण्याचे नियोजन करतो.
त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्यात बऱ्यापैकी पेट्या कोकणातून जातात. यंदा वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यांन राजापूरसह रत्नागिरी तालुक्यातील काही भागांतून आंबा वाशीकडे पाठविण्यास सुरुवात झाली; परंतु सिंधुदुर्गमधून चांगल्या प्रमाणात आंबा बाजारात गेल्याचे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये वाशीमध्ये ४० ते ६० हजारांच्या दरम्यान आंबा पेटीची आवक होत आहे. गुढीपाडव्याला मोठी वाढ झाली असून दरही दीड हजार ते ४ हजार रुपये पाच डझनच्या पेटीला मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत आंबा अधिक असला तरीही दर दोन हजार रुपयांनी कमी आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »