काजीसांगवी येथे कारगिल विजय दिवस साजरा
काजीसांगवी:उत्तम आवारे-काजीसांगवी येथिल ग्रामपंचायत व चांदवड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने शिवाजी चौकातील शहीद सुरेश स्मारकाला अभिवाद करुन कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला.
येथिल जवान सुरेश विण्णु सोनवणे यांचे दि 6जुन 1999रोजी कारगील युध्दात शहीद झाले त्यांचे स्मारक येथिल शिवाजी चौकात शिवाजी पुतळ्याजवळ उभारण्यात आले आहे प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या दिवशी मोठ्या उत्साहाने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ या स्मारकास अभिवादन करतात .परंतु येथिल ग्राम पंचायत च्या वतीने कारगील विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच कल्पना ठाकरे यांनी शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून माजी सैनिक बाळासाहेब ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच शहीद सुरेश सोनवणे यांच्या स्मारकाची पूजन ग्रामस्थ पुंजाराम ठाकरे व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळू गाढे यांनी केले तर स्मारकास शहीद पत्नी संगीता सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित त्यांनी शहीद सुरेश सोनवणे यांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच कल्पना ठाकरे उपसरपंच कल्पना सोनवणे सदस्य दत्तू आहेर, वनिता सोनवणे ,पुंजाराम ठाकरे, अजित बाबा ठाकरे ,माजी सैनिक पंढरीनाथ सोनवणे, विवेक ठाकरे, कृष्णा सोनवणे, सुरेश ठाकरे, प्रभाकर सोनवणे ,विलास सोनवणे ,बंटी बोराडे ,मधुकर ठाकरे, अनिल सोनवणे, सागर शिंदे ,राहुल शिंदेआदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते