काजी सांगवी विद्यालयात शिक्षक पालक मेळावा संपन्न


काजीसांगवी:उत्तम आवारे–येथील कै नरहर पंत कारभारी ठाकरे जनता विद्यालयात  विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्देशाने शिक्षक पालक मेळावा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शरद सोनवणे हे होते .व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर, म वि प्र चे संचालक जगनाथ निंबाळकर ज्येष्ठ सभासद नवनाथ आहेर पर्यवेक्षक सिमा वारके होत्या. प्रारंभी उपस्थित पालकांचे शालेय संगीत मंचाने स्वागत गीताने स्वागत केले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती वारके यांनी शालेय उपक्रमाबाबत संपूर्ण माहिती  आपल्या प्रास्ताविकातुन सांगितली. तसेच पालक सुनिल काळे यांनी  विद्यार्थाना मैदानी खेळा बाबत  येणाऱ्या उणीवांची शिक्षकांना जाण करून दिली तसेच विद्यार्थ्यां शी पालकांचा संवाद कुटुंब व आरोग्य कसे सांभाळावे बुद्धी भावनांचा मेळ पाल्यावरील योग्य संस्कार कसे करावे अशा विविध गोष्टीवर मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य न्याहारकर यांनी पालकांनी पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावा टीव्ही मोबाईल शक्यतो बंद करावेत .पुस्तके ग्रंथालय याबाबत विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल असे घरातील वातावरण पालकांनी तयार करावे .यावेळी नवीन शिक्षक पालक संघाची कार्यकारणी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माणिक कुंभारे यांनी केले यावेळी विलास ठाकरे, सागर मेचकुल, अभिमान मस्के, ज्ञानेश्वर ठाकरे, उत्तम आवारे, सुनील काळे,
भागवत तळेकर, योगेश सोनवणे, उत्तम दुग्धे , नितीन सोनवणे, आदी सह पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »